ठाणे : बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने मंडळातील सर्व नोंदणीकृत सुरक्षा रक्षक व अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे की, मंडळातील प्रतीक्षा यादीवरील सुरक्षा रक्षकांना ड्युटी देण्यासाठी ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व सुरक्षा रक्षकांनी ड्युटीसाठी आपली पसंती केवळ या ऑनलाईन प्रणालीद्वारेच नोंदवावी व त्याच माध्यमातून ड्युटी स्वीकारावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच ड्युटी संदर्भात किंवा इतर कोणत्याही कार्यालयीन कामाकरिता, जसे की शिफ्ट बदल, पगार काढणे, रजा घेणे इत्यादी कारणांसाठी कोणत्याही बाहेरील व्यक्तीकडून, सुरक्षा कर्मचाऱ्याकडून किंवा मंडळातील कर्मचाऱ्याकडून पैशांची मागणी केल्यास संबंधित बाब तात्काळ मंडळास लेखी स्वरूपात कळवावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सुरक्षा रक्षकांनी कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीवर विश्वास ठेवून कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. अशा प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार झाल्यास त्यास मंडळ जबाबदार राहणार नाही. असे आवाहन कामगार उपआयुक्त तथा मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके यांनी केले आहे.

0 Comments