प्रवासी महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करून तिची लूट करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकास पोलीसांनी अवघ्या ४८ तासांच्या आत अटक करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आरोपीकडून जबरी चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
पनवेल : बुधवार दि. ११ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पिडीत महिला संगिता सोमनाथ भोईर, रा. पनवेल ह्या ऑटो रिक्षाने राहते घरी जात असताना करंजाडे आर/०४ मधील सत्य ट्रायंडंट बिल्डींगच्या बाजूला असलेल्या सर्विस रोडवर आल्यानंतर रिक्षा चालकाने पिडीत महिलेस रिक्षा बंद पडली आहे असे सांगून रिक्षा थांबवुन पिडीत महिलेच्या गळ्यावर, छातीवर व पायावर धारदार चाकुने वार करुन पिडीतास गंभीर जखमी केले व जबरदस्तीने पिडीताकडील सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याची चैन, मोबाईल फोन व रोख रक्कम हिसकावून घेऊन पिडीतास रस्त्यावर सोडून पळुन गेला होता. सदर घटनेच्या अनुषंगाने बुधवार दि. ११ फेब्रुवारी रोजी पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १०७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (६), ३११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांचे पर्यवेक्षणाखाली चार पोलीस पथके तयार करुन तपास सुरु करण्यात आला. त्याच प्रमाणे मा. पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखे कडून समांतर तपास सुरु करण्यात आला. सदर पथकांनी सी.सी.टी.व्ही. कॅमेरा फुटेजची तपासणी, तांत्रिक तपास, साक्षीदारांकडे तपास केला. तपासा दरम्यान एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न करुन तपास केला. ऑटो रिक्षाचा क्रमांकाचे शेवटचे चार आकडेबाबत माहिती मिळाली. रिक्षा क्रमांकाचा सिरीज, कोड साक्षीदाराच्या लक्षात नव्हता. या माहितीवरुन सदर चार अंकाचा क्रमांक असलेल्या ऑटो रिक्षाचा शोध सुरु करण्यात आला. संशयीत ऑटो रिक्षा चालकांकडे विचारपुस करण्यात आली. त्यावरुन एमएच ०४ एलएक्स ४६१९ (MH 04 LX 4619) या ऑटो रिक्षाचा रिक्षा चालक अक्षय एकनाथ बागडे, वय २७ वर्षे, रा. करंजाडे, से. आर/०३, तो. पनवेल या रिक्षा चालकाने सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. सदर रिक्षा चालकाने त्याने घेतलेल्या कर्जाची परत फेड करण्यासाठी पैसे मिळविण्याच्या उद्देशाने नमुद गुन्हा केल्याचे प्राथमिक तपासा दरम्यान सांगितले आहे. गुन्ह्याचे तपासा दरम्यान आरोपीने पिडीत महीलेकडून चोरलेले सोन्याचे मंगळसुत्र व गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पनवेल शहर पोलीस स्टेशन करीत असुन पुढील तपासकामी अटक आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड मिळणेकामी त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई श्री. भाऊसाहेब ढोले, सहा. पोलीस आयुक्त पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री शाकीर पटेल, पोलीस निरीक्षक (प्रशा) अभिजीत अभंग आणि पनवेल शहर पोलीस ठाणे कडील सपोनि कृष्णा धामापुरकर, सपोनि प्रविण फडतरे, सपोनि राजेंद्र घेवडेकर, पोउपनि विनोद लभडे, पोउपनि हजरतअली पठाण, पोहवा १३७८ अविनाश गंथडे, पोहव २०६८ परेश म्हात्रे, पोहवा १८५१ महेंद्र वायकर, पोहवा २३२६ संदेश म्हात्रे, पोहवा २२२८ अमोल पाटील, पोना २८९० संजय सावंत, पोना३२९० सम्राट डाकी, पोना ३२९५ मिथून भोसले, पोशि ३०७० शशिकांत काकडे, पोशि १२३८७ नितीन कांबळे, पोशि ३७३३ विशाल दुधे, पोशि ४२९४ सचिन कोर व पोशि ५०३३ किरण कराड यांनी केली आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रवास करताना सतर्क राहावे व कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित पोलीसांना कळवावे.
0 Comments