Business

काम केले, पण वेतन नाही! सुरक्षा रक्षकांच्या न्यायासाठी पत्रकार राठोड मैदानात, उद्यापासून करणार जल व अन्नत्याग आमरण उपोषण

हा सरळ सरळ अन्याय आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील." - सतिष एस राठोड, पत्रकार

सतत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत राठोड यांनी सांगितले की, "कामगारांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले, पण त्यांना वेतनच मिळाले नाही. हा सरळ सरळ अन्याय आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील." - सतिष एस राठोड, पत्रकार

नाशिक : उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय, सुरक्षा रक्षकांच्या थकीत वेतनाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष तथा कामगार उप आयुक्त विकास माळी यांच्या दालनात सोमवार रोजी आयोजित करण्यात आलेली महत्त्वाची बैठक ही निष्फळ ठरली असून सुरक्षा रक्षकांच्या वेतनाचा तिढा अद्याप कायम आहे. डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील थकीत वेतनाबाबत सुरक्षा रक्षकांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे.

हा सरळ सरळ अन्याय आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील." - सतिष एस राठोड, पत्रकार

      सदर बैठकीस कामगार उप आयुक्त विकास माळी यांच्यासह मंडळाच्या सचिव मधुरा सुर्यवंशी, निरीक्षक विशाल जोशी जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी अनिल दवडे, क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचे प्रतिनिधी गजानन साळुंखे, सतिष एस राठोड, पत्रकार हे उपस्थित होते. मात्र सुरक्षा रक्षकांच्या प्रमुख मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे सुरक्षा रक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा सरळ सरळ अन्याय आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील." - सतिष एस राठोड, पत्रकार

       कामगार प्रतिनिधी सतिष एस. राठोड यांनी सांगितले की, आमच्या संघटनेच्या वतीने वारंवार निवेदने देऊनही सुरक्षा रक्षकांच्या न्याय हक्कांकडे दुर्लक्ष केले जात आहे. महिनोनमहिने प्रामाणिक सेवा देणाऱ्या सुरक्षा रक्षकांना त्यांचे हक्काचे वेतन न मिळणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

        प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून सुरक्षा रक्षकांचे डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील थकीत वेतन अदा करावे, तसेच पुढील काळात नियमित वेतन हे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला अदा करण्याबाबत ठोस लेखी पत्र संघटनेला द्यावे. अन्यथा नाशिक जिल्हा रुग्णालय येथे जल व अन्नत्याग आमरण उपोषण करण्याच्या निर्णयावर ठाम आहोत. सुरक्षा रक्षकांच्या न्याय हक्कांसाठी हे उपोषण शेवटपर्यंत लढविण्याचा निर्धार कामगार प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.

हा सरळ सरळ अन्याय आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील." - सतिष एस राठोड, पत्रकार



Post a Comment

0 Comments