Business

हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालेल्या सुरक्षा रक्षकाच्या परिवाराला सुरक्षारक्षकांच्या वतीने आर्थिक मदत

हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालेल्या सुरक्षा रक्षकाच्या परिवाराला सुरक्षारक्षक तर्फे आर्थिक मदत


मुरबाड : मुरबाड तालुक्यातील मानिवली येथील हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालेले सुरक्षा रक्षक कै. दत्ता माळी यांच्या कुटुंबियांना शनिवार रोजी आर्थिक मदत देण्यात आली. क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघर्ष कृती समिती संलग्न क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेच्या वतीने सुरक्षा रक्षकांना आवाहन करण्यात आले होते, की यथाशक्ती आर्थिक मदत कै. दत्ता माळी यांच्या परिवाराला करावी. तसेच या उपक्रमामुळे माळी यांच्या परिवाराला मोलाची मदत मिळालेली आहे.

कै. दत्ता माळी हे सुरक्षा रक्षक मंडळाच्या कल्याण शाखेच्या वतीने वासिंद येथील महावितरणच्या आस्थापनेत कार्यरत होते.  कै. दत्ता माळी यांच्या धर्मपत्नीस सतरा हजार पाच रुपये रकमेचे धनादेश सुपूर्द करण्यात आले असून ही मदत महाराष्ट्र राज्य  सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदीत सुरक्षा रक्षक यांच्या वतीने करण्यात आली आहे.

हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालेल्या सुरक्षा रक्षकाच्या परिवाराला सुरक्षारक्षक तर्फे आर्थिक मदत

याप्रसंगी क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचे उपाध्यक्ष गजानन साळुंखे, पत्रकार रविंद्र गोतरणे, पत्रकार सतिष एस राठोड, गणेश धसाडे, वैभव गोतरणे पालघर आदी उपस्थित होते.

तसेच परमेश्वर देशमुख, चेतन डाखोरे औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर), सुशिल पवार, महेश वेखंडे, महेश खांडेकर , सचिन पवार सोलापूर, संदिप पोतदार, सुनिता नंदमहेर यांच्यासह सुरक्षा रक्षकांच्या पुढाकाराने हे उपक्रम राबविण्यात आले.

Post a Comment

0 Comments