Business

पुस्तक प्रदर्शनात लेखक डॉ. संकेत धाराशिवकर यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

 

SIBC-Law-College-Book-exhibition

भिवंडी : ऐतिहासिक, चरित्रात्मक, आत्मचरित्र, वैचारिक आदी विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके श्री. इंद्रपाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवार दि. 17 जानेवारी रोजी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यातील अनेक पुस्तके तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जपली जात आहेत. ग्रंथालयात अनेक दुर्मीळ पुस्तके आहेत. या खजिन्याबद्दल वाचकांना माहिती मिळावी, असा याचा हेतू असल्याचे ग्रंथपाल अलका मिलिंद ढगे यांनी सांगितले. या पुस्तकांचे एखादे पान जरी वाचकांपर्यंत पोहोचले, तरी त्यातील वेगळेपणा आणि सौंदर्य उलगडते. त्यातून हा खजिना शोधण्याची इच्छाही निर्माण होते, त्यामुळे हे प्रयत्न करण्यात येत आहेत.

SIBC विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रदर्शन सोहळा उत्साहात साजरा

श्री. पंडित बाबुराव चौघुले कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. संकेत धाराशिवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला, श्री. इंद्रपाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गायत्री पाटील, सहायक प्राध्यापक ॲडव्होकेट अंबर जोशी, सहायक प्राध्यापक ॲडव्होकेट डॉ. स्वप्निल पाटील, सहायक प्राध्यापक ॲडव्होकेट सायली ठाकूर, सहायक प्राध्यापक ॲडव्होकेट वीणा कोंडा, ग्रंथपाल अलका ढगे, ग्रंथपाल समिधा पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्मचारीवृंद उपस्थित होते.

प्राचार्य तथा लेखक डॉ. संकेत धाराशिवकर यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
प्राचार्य तथा लेखक डॉ. संकेत धाराशिवकर यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

श्री. पंडित बाबुराव चौघुले कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य तथा लेखक डॉ. संकेत धाराशिवकर यांनी याच उपक्रमाचा भाग म्हणून ऑनलाइन गूगल मीटद्वारे विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती देऊन त्यांच्याशी मुक्त संवाद साधला व पुस्तकाची रचना कशी करावी तसेच पुस्तक तसेच ग्रंथाचे लेखन करुन प्रकाशन कसे करावे. याबद्दल मोलाचे असे मार्गदर्शन केले.

SIBC विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रदर्शन सोहळा उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांचे मन पुस्तकांकडे वळावे..! - प्राचार्य डॉ. गायत्री पाटील

विद्यार्थ्यांचे मन पुस्तकांकडे वळावे, त्यांच्यामध्ये वाचन संस्कार प्रबळ व्हावा, या उद्देशाने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गायत्री पाटील यांनी केले.

'चला पुस्तकांशी मैत्री करूया’ - ॲडव्होकेट डॉ. स्वप्निल पाटील, सहायक प्राध्यापक

सहायक प्राध्यापक ॲडव्होकेट डॉ. स्वप्निल पाटील यांनी आयुष्य घडविण्यासाठी पुस्तकांशी मैत्री करा..! असा सल्ला उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

SIBC विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रदर्शन सोहळा उत्साहात साजरा

SIBC विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रदर्शन सोहळा उत्साहात साजरा

SIBC विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पुस्तक प्रदर्शन सोहळा उत्साहात साजरा


Post a Comment

0 Comments