Business

महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक, माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार यांच्या विविध संघटना व संयुक्त समितीची बैठक

 

महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) (सुधारणा) विधेयक क्र. ३४ यावरील संयुक्त समितीची बैठक

सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३४ - महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ आणि महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण), १९८१ यात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक यावरील बैठक


मुंबई : महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९६९ यामध्ये सुधारणा करण्यासाठी सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्र. ३४ हे विधेयक डॉ. सुरेश खाडे, मा. कामगारमंत्री तथा समिती प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांच्या संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठविण्यात आले होते. त्या अनुषंगाने या विधेयकातील विषयाबाबत जनतेकडून (विशेषतः माथाडी, हमाल, इतर श्रमजीवी कामगार व त्यांच्या संघटना तसेच खासगी सुरक्षा रक्षक व त्यांच्या संघटना, विविध कंपन्यांचे मालक तसेच सदर क्षेत्रातील तज्ज्ञांकडून) सुधारणा / सूचना मागविण्याचा निर्णय समितीने घेतला होता. त्यानुसार उपरोक्त नमूद केलेल्या ज्या व्यक्ती/ संघटना/ संस्था इत्यादी सूचना सुधारणा प्रत्येकी तीन प्रतींमध्ये निवेदनाच्या स्वरूपात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडे शुक्रवार, दिनांक ६ ऑक्टोबर, २०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशा बेताने श्री. जितेंद्र भोळे, सचिव (१) (कार्यभार), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन यांच्याकडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते.


महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) (सुधारणा) विधेयक क्र. ३४ यावरील संयुक्त समितीची बैठक

तसेच सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३४ महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) (सुधारणा) विधेयक, २०२३ यावरील संयुक्त समितीची पुढील बैठक ही होणार आहे. विविध संघटनेने या विधेयकावर सुधारणा, सुचना नोंदविलेल्या असून उपरोक्त विषयांकित विधेयकासंदर्भात बुधवार, दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त समितीच्या बैठकीत, समितीची पुढील बैठक बुधवार, दिनांक १८ ऑक्टोबर, २०२३ रोजी आयोजित करावयाचा निर्णय घेण्यात आला आहे.


महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) (सुधारणा) विधेयक क्र. ३४ यावरील संयुक्त समितीची बैठक

समितीच्या उपरोक्त निर्णयानुसार सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३४ - महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) (सुधारणा) विधेयक, २०२३ यावरील संयुक्त समितीची पुढील बैठक बुधवार, दिनांक १८ ऑक्टोबर, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता सभागृह क्रमांक ०४, सह्याद्री अतिथी गृह, मलबार हिल, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीत विविध कामगार संघटना तसेच उद्योजक यांच्यासमवेत चर्चा करण्यात येणार आहे.




Post a Comment

0 Comments