धुळे : धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे कार्यरत सुरक्षा रक्षक हे राज्य कामगार विमा योजना (ईएसआय) आदी सुविधांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे. मंडळाच्या तसेच ईएसआयच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्या कारणामुळे सुरक्षा रक्षकांना राज्य विमा योजनेचा लाभ मिळणे कठिण झाले असून, सुरक्षा रक्षकांना हाल सोसावा लागत आहे.
राज्य कामगार विमा योजना (ईएसआय) ची रक्कम ही दर महिन्याला नियमानुसार सुरक्षा रक्षकांच्या वेतनातून कपात केली जाते, तरी सुद्धा सुरक्षा रक्षकांना राज्य विमा योजनेचा लाभ मिळत नसल्याने 'ईएसआय' अंतर्गत मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे.
धुळे शहरी व ग्रामीण भागातील सुरक्षारक्षकांना ईएसआय रुग्णालयाची पूर्ण सुविधा मिळण्यात यावी या विषयाचे निवेदन सौ. वैशाली भावसार (ईएसआय रुग्णालय अधिकारी) धुळे , यांना भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेनेच्या वतीने देण्यात आले आहे. निवेदन देताना सुरक्षा रक्षक पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य कामगार विमा योजनेविषयी -
राज्य कामगार विमा अधिनियम 1948 अंतर्गत कामगारांसाठी राज्य कामगार विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. राज्यात सप्टेंबर 1954 मध्ये प्रथम ही योजना लागू करण्यात आली. दहा किंवा जास्त कामगार असणाऱ्या सर्व कारखान्यांना राज्य विमा योजना अधिनियमाअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी कामगारांची कमाल वेतन मर्यादा ज्यादा काम वगळून 21 हजार इतकी असायला हवी.
धुळे अंतर्गत धुळे, जळगाव, नंदुरबार सुरक्षारक्षक मंडळामधील धुळे शहर व ग्रामीण भागातील कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांना ईएसआय रुग्णालय धुळे, यांची कुठल्याही प्रकारे सुविधा मिळत नाही. सुरक्षा रक्षकांच्या दरमहा वेतनातून 250/300 रुपये ईएसआय रुग्णालयाची सुविधा मिळावी म्हणून कपात केले जातात. रुग्णालयात उपचारासाठी गेले असल्यास कधी डॉक्टर राहत नाही, तर कधी आमच्याकडे हा उपचार होत नाही असे उत्तर दिले जाते, त्यामुळे नाहक सुरक्षा रक्षकांना खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घ्यावा लागतो. तरी आपणास सांगू इच्छितो की धुळे शहरी व ग्रामीण भागातील सुरक्षारक्षकांना ईएसआय रुग्णालयाची पूर्ण सुविधा मिळण्यात यावी या विषयाचे निवेदन सौ. वैशाली भावसार (ईएसआय रुग्णालय अधिकारी) धुळे , यांना दिले आहे.
- सचिनभाऊ राऊत, अध्यक्ष (भारतीय सुरक्षा रक्षक कामगार सेना)
0 Comments