कल्याण (आंबिवली) : आज दिनांक 11 /12/ 2024 वार बुधवार रोजी PLANET GHP च्या कै. गजानन हिरु पाटील विद्यामंदिर, मातोश्री शेवंताबाई गजानन पाटील माध्यमिक विद्यालय कै. गजानन हिरु पाटील इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या प्रांगणामध्ये ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ल्यांचे भव्य दिव्य असे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
महाराष्ट्राची स्वतंत्रभूमी तयार होण्याआधी शौर्याचा एक मोठा इतिहास या किल्ल्यांनी पाहिलेला आहे. त्याकाळी संरक्षणासाठी महत्त्व असलेले किल्ले आज आपल्या इतिहासाची, आपल्या पूर्वजांच्या शौर्याची सोनेरी पाने म्हणून आपल्याला तितकेच महत्त्वाचे आहेत. हाच इतिहास आपल्या भावी पिढीला प्रेरणा व दुरुस्ती देण्याचे काम करत आहे त्यासाठी आजचा हा किल्ले प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न संपन्न झालेला आहे.
संस्कृतीचे कौतुक हवे, इतिहासाचे कौतुक हवे, गड-किल्ल्यांचे कौतुक हवे त्यासाठीच शाळेतील विद्यार्थ्यांनी आज दरवर्षीप्रमाणे किल्ल्यांचे प्रदर्शन मांडलेले आहे.
तसेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात संस्था सचिव व मुख्याध्यापक श्री.गणेश गजानन पाटील तसेच प्लॅनेट जीएचपी तील सर्व शिक्षकवृंद यांनी मोठं योगदान दिलेलं आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी संस्था अध्यक्ष श्री नारायण गजानन पाटील, लायन्स क्लब कल्याण उपाध्यक्ष लायन डि के रेलिया, लायन्स क्लब कल्याण खजिनदार लायन सुनील शर्मा, लायन्स क्लब कल्याण सदस्य भानुदास मडके, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघ सचिव प्रवीण लोंढे, ठाणे जिल्हा शिवछत्रपती शिक्षक संघटना उपाध्यक्ष मगर सर, मुकेश पाटील, भाऊसाहेब शिंदे, अनिल पाटील, नरेश पाटील, शशिकांत पाटील, विलास रंधवे, हरीश पाटील, हरिश्चन्द्र पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमचे शेवटी सचिव व मुख्याध्यापक श्री.गणेश गजानन पाटील यांच्या हस्ते प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
0 Comments