Business

अट्टल सोनसाखळी चोरास शिताफिने अटक, बदलापूर पोलिसांची उत्तम कामगिरी

अट्टल सोनसाखळी चोरास शिताफिने अटक, बदलापूर पोलिसांची उत्तम कामगिरी

बदलापूर : दिनांक २८.११.२०२४ रोजी रात्रौ १०.३८ वाजताचे सुमारास, बदलापूर पुर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी सौ. राजश्री विजय गोरख, वय ४० वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. बदलापुर पूर्व या कामावरून घरी पायी जात असताना एका अनोळखी मोटरसायकलस्वाराने त्यांच्या पाठीमागून येऊन गळ्यावार थाप मारून त्यांच्या गळ्यातील ४५,०००/- रूपये किमंतीचे एक तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने खेचुन नेले होते. त्याबाबत बदलापुर पूर्व पोलीस ठाणे येथे गु.र.न. ।४९८/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल होता.

सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. राजेश गज्जल व डिबी पथकातील अंमलदार हे करीत असताना बदलापूर पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात घटनास्थळावरील व आजुबाजुच्या ठिकाणचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासत असताना, सी.सी.टी.व्ही. मध्ये संशयास्पदरित्या एका मोटारसायकलवर एक इसम हा रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या महिलांकडे पाहत असताना दिसला. लागलीच सदर तपास पथकाने गांधी चौक, बदलापूर येथे शिताफीने त्यास ताब्यात घेतले. याच्या ताब्यातील डिस्कव्हर मोटार सायकलचा नंबर हा बनावट असल्याने त्याच्या कडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे नाव प्रविण प्रभाकर पाटील, वय ३९ वर्षे, रा.शेलु, ता. कर्जत, जि. रायगड असे सांगितले व पोलीसांनी सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यावरून त्यास सदर गुन्ह्यात अटक करून सखोल तपास केला असता त्याने बदलापूर पूर्व व बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकुण ५ सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्याच्या कडुन ४५ ग्रॅम वजनाचे एकुण रूपये २,२७,०००/- किमंतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगीरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-४, उल्हासनगर, श्री. सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ, श्री. शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक/श्री. किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) / श्री. राजेश गज्जल, पोलीस उप निरीक्षक गोविंद चव्हाण, पोलीस उप निरीक्षक, प्रशांत थिटे, सहा पो.उप.निरी. राजाराम कुकले, पो. हवा./विजय गिरीगोसावी, पो. हवा./ जगदिश म्हसकर, पो.हवा. सुधाकर वरखंडे, पो. हवा. /कृष्णा पाटोळे, पो. हवा/विष्णु मिरकले, पो.हवा/कुणाल शिर्के, पो.ना/विनोंद नेमाणे पो.शि./महादेव पिसे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments