Business

श्री. इंद्रपाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालय व श्री साई सेवा संस्था भिवंडी यांच्या वतीने वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना मार्गदर्शन


भिवंडी : जगभरात सेक्स वर्करची सामाजिक स्थिती बिकट आहे. बऱ्याचदा त्यांना वेश्याव्यवसायाच्या दुनियेत ढकलले जाते. किंवा ते स्वतःच्या इच्छेने सुद्धा येतात. पण त्यांना या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी समाजाच्या सकारात्मक भूमिकेची गरज महत्त्वाची असते हेच उद्देश समोर ठेऊन श्री. इंद्रपाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालय व श्री साई सेवा संस्था भिवंडी यांच्या वतीने वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना त्यांचे हक्क मिळवून देणे व त्यांचे असलेले हक्क याच्याविषयी श्री इंद्रपाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालयतील लीगल सेलच्या वतीने मदत केली जाणार आहे. सेक्स वर्कर्स संबंधात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आणि यंत्रणांकडे असलेल्या माहितीच्या आधारे भारतात किमान ३० लाख मुली, महिला शरीरविक्रीच्या बाजारात असून त्या आपल्या वाट्याला आलेले आयुष्य जगत आहेत, असा एक सर्वमान्य अंदाज आहे. ही संख्या अधिकची ही असू शकते.

महाविद्यालयातील लीगल सेलच्या वतीने मदत केली जाणार - श्री. इंद्रपाल चौघुले 

वेश्याव्यवसाय हा एक व्यवसाय आहे आणि लैंगिक कर्मचार्‍यांना कायद्यानुसार आदर आणि समान संरक्षण मिळण्याचा हक्क आहे." हे स्पष्ट होते की सेक्स वर्कर्स प्रौढ आहे आणि ती सहमतीने वेश्याव्यवसायात गुंतलेली आहे, तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करणे किंवा त्यांच्यावर कोणतीही गुन्हेगारी कारवाई करणे टाळले पाहिजे. या देशातील प्रत्येक व्यक्तीला राज्यघटनेच्या कलम 21 नुसार सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार आहे.

वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या हक्क व कर्तव्याविषयी जास्त चर्चा होत नाहीत. - डॉ. स्वाती सिंह (अध्यक्ष - श्री साई सेवा संस्था )

भारतात कुंटनखान्यांपासून ते पंचतारांकित हॉटेलांपर्यंत, खासगी फ्लॅटपासून ते बकाल झालेल्या लॉजपर्यंत, स्पा/हेल्थ क्लबच्या नावाखाली ते अगदी रस्त्यापर्यंत आणि वरवर लक्षातही येणार नाही अशा अवगुंठीत परिसरात शरीरविक्रीचे बाजार चालू असतात. शरीरविक्रीचा बाजार हे एक समांतर असे जग आहे. याला फारशी किंमत, पत आणि सहानुभूती नसते. अशा या पत नसलेल्या जगाविषयी नेहमीच बोलले जाते. त्यांच्या हक्का विषयी त्यांच्या कर्तव्य विषयी जास्त चर्चा होत नाहीत.

मजबुरीने व्यवसायात आलेल्या महिला मुलींना या दलदलीतून काढणे महत्वाचे - अंबर जोशी ( सहाय्यक प्राध्यापक )

या व्यवसायात येणाऱ्या महिला, मुली काही कारणास्तव मजबुरीने या क्षेत्राकडे येतात. अशा महिला, मुलींना या दलदलीतून बाहेर काढणे. हे आपले तसेच समाजाचे सुद्धा काम आहे. काम करत असताना बऱ्याच मुलींना, महिलांना पोलिसांनी टाकलेल्या धाड सत्रातून पकडले जाते. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतात म्हणून महाविद्यालयाच्या वतीने मदत केली जाईल.

महाविद्यालयाच्या वतीने मोफत सल्ला सोबतच सरकारी वकील मिळवून देण्यास मदत -  डॉ. गायत्री पाटील, प्राचार्य

श्री. इंद्रपाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालयाच्या वतीने वेश्याव्यवसाय करणाऱ्या प्रत्येक महिलांना कायदेविषय सल्ला मोफत देण्यात येते. ज्या महिला वकिलांची फी देण्यास असमर्थ आहे, त्या महिलांना आमच्या महाविद्यालयाच्या वतीने मोफत सल्ला सोबतच सरकारी वकील मिळवून देण्यास मदत केली जाईल.

तसेच ( सहाय्यक पोलीस निरीक्षक ) चव्हाण साहेब म्हणाले की वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांमध्ये अल्पवयीन मुली असतील तर त्यांना त्यातून बाहेर काढण्यास पोलीस विभागाकडून प्रयत्न केली जातात.

या कार्यक्रमात श्री. इंद्रपाल चौघुले सर , अंबर जोशी ( सहाय्यक प्राध्यापक ), डॉ. गायत्री पाटील मॅडम,  डॉ. स्वाती सिंह मॅडम , वसंत राठोड सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण सर, सोनम मॅडम, लता मॅडम, आदेश सर, प्रसन्न सर, भोसले सर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन श्री. इंद्रपाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालयात शिकत असलेले विद्यार्थी सरफराज अन्सारी, रोहित वाजे, नचिकेत पाटील, रविंद शेलार, प्रदमेश चौघुले, जतीन स्वामी, शैलेंद्र विश्वकर्मा, सतिष राठोड या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केले होते. 



Post a Comment

0 Comments