खातीवली शहापूर येथे एका वाईन शॉप मध्ये चक्क भेसळयुक्त दारु विक्री
शहापूर : खातीवली ग्रामपंचायत परिसरातील अनेक महिला बचत गट, व स्थानिक समाजसेवक यांच्या कडुन गुलशन वाईन शॉप बंद करण्याची मागणी होताना दिसत आहे..!
पत्रकार रविंद्र गोतरणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनुसार खातीवली हद्दीतील गुलशन वाईन शॉप येथे भेसळयुक्त विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती संबंधित तक्रारदार गोतरणे यांना मिळताच यांनी एक वेळ सोडून अनेक वेळा त्या वाईन शॉप मधून बनावट भेसळयुक्त दारू विकत घेऊन एक स्टिंग ऑपरेशन करत त्या सील पॅक दारूचे पुरावे गोळा करत हे स्टिंग ऑपरेशन पूर्ण केले आहे, शिवाय स्थानिक खातीवली ग्रामपंचायतने यापूर्वी गुलशन वाईन शॉप बंद विरोधात ग्रामसभेत ठराव पारित केला असून , याची लेखी तक्रार देखील ठाणे जिल्हाधिकारी, संबंधित राज्य उत्पादन शुल्क ठाणे, कल्याण चे अधिकारी, अधीक्षक तसेच स्थानिक पातळीवरील पोलीस यंत्रणेलाही दिली होती, तरीसुद्धा तक्रारदारास अपेक्षित सहकार्य मिळाले नसून काही महिने उलटले तरीही त्या वाईन शॉप वर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झाली नाही, या वाईन शॉप मधील भेसळयुक्त विषारी दारु अनेक मुले व नागरिकांना पोटाचे आजार झाले आहेत.
मुंबई दारूबंदी कायदा, १९४९ मधील तरतुदी विचारात घेता वाईन्स शॉप ला कोणत्याही प्रकारची दारु विक्री प्रसिद्धी साठी बॅनर जाहिरात करता येत नाही. या वाईन्स व्यवस्थापनाने बेशिस्तपणाचा कळस गाठला असून आज वर्ष होईल पण वाईन शॉप व्यवस्थापनाकडे अजूनही शासकीय नियमानुसार कायदेशीर प्रिंटेड पक्के बिल बुक सुद्धा नाहीत. बेकायदेशीर बॅनर बाजी, बाऊनसर्सची शो बाजी असे कृत्य या ग्रामीण भागात गुलशन वाईन मालक व्यवस्थापनाकडून चालू आहे.
दरम्यान, यांच्या विरोधात आजपर्यंत अनेक बचत गट, संघटनेने तक्रारी केल्या असून आजपर्यंत यावर सील बंद करण्याची ठोस कारवाई का झाली नाही ? याची शंका परिसरातील नागरिकांना येत आहे. असे तक्रारदार रविंद्र गोतरणे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे.
0 Comments