२० जून रोजी भारतीय दंड संहिता कलम ४२० व ३४ याप्रमाणे गुन्हा दाखल होऊन १० दिवस उलटूनही आरोपींना अटक नाहीच.
पेण (रायगड) : सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारे रॅकेट कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे. पेण तालुक्यातील अनेक तरुणांची फसवणूक झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. अशाप्रकारच्या प्रकरणात फसवणूक झालेल्यांपैकी कोणीही पुढे येत नसल्यामुळे हे रॅकेट मजबूत होताना दिसत होते, सध्या पेण तालुक्यातील अनेक मुलांची फसवणूक झालेली असून त्यापैकी प्रतिक रमेश पाटील सह ७ अन्य मराठी तरुण पुढे आले आहेत. त्यापैकी काही तरुणांनी व्याजाने पैसे काढून दिले आहेत, तर काहींनी आईचे मंगळसूत्र देखील विकले असल्याचे सांगितले आहे.
गेल्या ३ जानेवारी २०२३ रोजी संबंधित तरुणांची पेण पोलीस ठाण्यात रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात नोकरीचे आमिष दाखवून फसवणुक झाल्याचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन, मुंबई यांच्या पदाधिकारी १) नंदाताई माधवराव भोसले, २) अनिल सुंभाजी कदम ३) दिलीप गंगाधर पाटील, ४) हनुमंत अडसुळे यांच्या विरोधात केला होता, परंतु त्या तक्रार अर्जाची दखल होत नसल्याने तरुण हतबल झाले व चिंतेत होते, तसेच त्या अनुषंगाने माहिती अधिकार कार्यकर्ता तथा पत्रकार सतिष एस राठोड यांनी माहिती अधिकार कायदा २००५ अन्वये दि. १४ जून रोजी माहिती मागितल्या नंतर संबंधित अधिकाऱ्यांनी गेल्या ५ महिन्यापासून धूळ खात पडलेल्या तक्रार अर्जाची दखल घेत अखेर दि. २० जून रोजी भारतीय दंड संहिता अधिनियम १८६० अन्वये ४२० व ३४ या कलमानुसार गुन्हा दाखल करून घेतले असून त्याबद्दल माहिती दिलेली आहे.
पेण तालुक्यात असे अनेक एजंट फिरत असून त्यांनी तालुक्यातील अनेक बेरोजगार युवकांकडून प्रत्येकी एक ते दीड लाखांची वसुली सुद्धा केली असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच पैसेे देऊन सुद्धा आजतागायत नोकरी न मिळाल्याने बेरोजगार तरुण हतबल झाले आहेत.
या प्रकरणावर रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त विजय चौधरी यांच्याशी पत्रकार राठोड यांनी दूरध्वनीवरून संपर्क केला असता, त्यांनी रायगड मंडळाचा कार्यभार याच आठवड्यात घेतल्यामुळे संबंधित प्रकरणाची माहिती घेऊन त्याविषयी सविस्तर माहिती देणार असल्याचे सांगितले आहे.
0 Comments