नाशिक ग्रामीण रुग्णालयाची सुरक्षा सांभाळणाऱ्या सुरक्षारक्षकांना मागील गेल्या 5 महिन्यांपासून वेतनापासून वंचित आहेत. त्यामुळे सुरक्षारक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयाची सुरक्षा सांभाळणाऱ्या सुरक्षारक्षकांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतन मिळालेला नसतानाही सुरक्षा रक्षक कर्तव्य बजावीत आहेत. तसेच वेतन मिळाले नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली असून हाल सोसावे लागत आहे.
यासंदर्भात सोमवार दि. 18 सप्टेंबर रोजी सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचे उपाध्यक्ष गजानन साळुंखे व पत्रकार सतिष एस राठोड यांनी नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष तथा कामगार उपआयुक्त यांना लेखी निवेदन देऊन सकारात्मक चर्चा देखील करण्यात आली. परंतु अद्याप पर्यंत सुरक्षा रक्षकांच्या खात्यात वेतन जमा केले गेलेले नाहीत. संघटनेच्या वतीने वारंवार विचारपूस केली असता सुरक्षा रक्षक मंडळाकडून आरोग्य विभागाकडे पाठपुरावा सुरु असल्याची माहिती दिली जात आहे.
तसेच शुक्रवार दि. 22 सप्टेंबर रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याशी पत्रकार राठोड यांनी फोनवर सविस्तर चर्चा केली असता आरोग्य विभागाला शासनाकडून निधी लवकर मिळाला नसल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याची माहिती देण्यात आली. तसेच शासनाकडून गुरुवार रोजी 80 लाख रुपये निधी प्राप्त झाले असून लवकरच सुरक्षा रक्षकांचे थकीत वेतन अदा केले जाईल असे सांगितले. परंतु अजूनही सुरक्षा रक्षकांना वेतन अदा केल्या नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या अधिपत्याखाली उपजिल्हा रुग्णालय कळवण, ग्रामीण रुग्णालय देवळा, ग्रामीण रुग्णालय सटाणा, ग्रामीण रुग्णालय उमराणे, ग्रामीण रुग्णालय डांगसौंदाणे, ग्रामीण रुग्णालय नामपूर, ग्रामीण रुग्णालय दाभाडी, ग्रामीण रुग्णालय येवला, उपजिल्हा रुग्णालय मनमाड, उपजिल्हा रुग्णालय निफाड, ग्रामीण रुग्णालय नांदगाव, ग्रामीण रुग्णालय नगरसूल, उपजिल्हा रुग्णालय चांदवड, ग्रामीण रुग्णालय, झोडगे, ग्रामीण रुग्णालय वणी, ग्रामीण रुग्णालय सिन्नर, ग्रामीण रुग्णालय गिरणारे, ग्रामीण रुग्णालय घोटी, ग्रामीण रुग्णालय इगतपूरी, ग्रामीण रुग्णालय बाहे, ग्रामीण रुग्णालय पेठ, ग्रामीण रुग्णालय हरसूल, ग्रामीण रुग्णालय सुरगाणा, ग्रामीण रुग्णालय अभोणा, उपजिल्हा रुग्णालय, त्र्यंबकेश्वर, ग्रामीण रुग्णालय लासलगाव, ग्रामीण रुग्णालय दिंडोरी येथे महाराष्ट्र राज्य स्थापित नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे 75 च्या आसपास सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत.
शासनाकडे पाठपुरावा करुन निधी आणण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. मात्र तसे होत नसल्याने ही परिस्थिती उद्भवत असून सुरक्षारक्षकांचे यामध्ये हाल होत आहेत.
0 Comments