संभाजी नगर (औरंगाबाद) : संभाजी नगर (औरंगाबाद) जिल्ह्यात कामगारांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेली क्रांतीज्योत कामगार संघटना ही एकमेव संघटना आहे. संघटनेचे प्रतिनिधित्व संघटनेचे अध्यक्ष दिपकभाऊ थोरात, उपाध्यक्ष चेतनभाऊ डाखोरे, सुरक्षा रक्षक विभाग संघटक- परमेश्वर देशमुख, सचिव सौ. स्वाती खिल्लारे हे करतात. परमेश्वर देशमुख हे सुरक्षा रक्षकांच्या न्याय हक्काच्या मागण्या व हिताच्या गोष्टी, सुरक्षा रक्षकांना जागृत करण्याचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून खुप चांगल्या प्रकारे करतात व क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघर्ष कृती समितीचे प्रसार माध्यम प्रमुख म्हणून देखील कार्यरत आहेत.
आझाद मैदान येथे १७ ते १९ मे पर्यंत चाललेल्या आंदोलनाला संभाजीनगर औरंगाबादहून दिपकभाऊ थोरात व सौ. स्वाती खिल्लारे यांनी आझाद मैदान येथे आवर्जून भेट दिली व १९ मे रोजी मंत्रालय येथे कामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब खताळ यांच्या सोबत असलेल्या नियोजित बैठकीत सहभाग घेतला.
0 Comments