Business

अग्नी शस्त्र बाळगून वाहतूक करणाऱ्या इसमाच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

 

अग्नी शस्त्र बाळगून वाहतूक करणाऱ्या इसमाच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

जळगाव : मा. एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, मा. श्री. चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री.रमेश चोपडे, मा. श्री. कृषिकेश रावले श्री. किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोना. २९९३ रविंद्र रमेश पाटील, पोना.३२४२ अविनाश बापुराव देवरे, पोकॉ. ३०३४ दिपककुमार फुलचंद शिंदे नेम. स्था. गु.शा. जळगांव संलग्न पोलीस मुख्यालय जळगांव यांना गुप्त बातमी मिळाली की, अडावद शहरात सायंकाळी ०५.०० वा. च्या नंतर एक इसम अवैध अग्निशस्त्राची तस्करी करणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना विनंती केली असता स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकॉ २७०७ संदिप रमेश पाटील व पोना. २३०६ प्रविण जनार्दन मांडोळे अशांचे पथक नेमून तात्काळ अडावद शहरात पाठविण्यात आले. 

अग्नी शस्त्र बाळगून वाहतूक करणाऱ्या इसमाच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

सदर पथकाने अडावद शहरातील बस स्थानकावर सापळा रचून वाडा- यावल बस क्र. एमएच २० बीएल २२७७ हिचेमध्ये बसलेल्या आरोपी नामे रमेश घुमरसिंग भिलाला, वय २८, रा. बजारखोद्रा ता. जि. खरगोन मध्यप्रदेश ह. मु. सिंधी ता. भुसावळ यास ताब्यात घेवून त्याचेकडून २५०००/- रु. किं.चा एक गावठी बनावटीचा कट्टा व १०००/- रु. किं.चा एक जिवंत काडतूस जप्त करुन आरोपी व मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी अडावद पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments