Business

सुरक्षा रक्षक आंदोलकांची उपसचिव खताळ यांच्या सोबत सकारात्मक चर्चा

 

सुरक्षा रक्षक आंदोलकांची उपसाचिव खताळ यांच्या सोबत सकारात्मक चर्चा
राज्यात सध्या जिल्ह्यानुसार ठाणे व बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, रायगड, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, सांगली, रत्नागिरी, नागपूर, चंद्रपूर, अमरावती असे एकूण १५ सुरक्षा रक्षक मंडळे स्थापन करण्यात आलेली असून, या १५ सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रात ३० जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
मुंबई :  प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र सेवा देणाऱ्या व करोडोची संपत्तीची देखभाल करणार्या नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांसमोर आज अनेक समस्या आहेत. मग त्या समस्या मिळणाऱ्या वेतनाची असो, की वेतनवाढीची असो, सुरक्षा रक्षकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न दुर्लक्षित झालेला आज आपल्याला पाहायला मिळतो. पण तरी देखील आज सुरक्षा रक्षक जागृत होतांना दिसत नाही. आपलेच हक्क असतात, ते मागून मिळत नाही, तर ते मिळवावे लागतात. हे कदाचित सुरक्षा रक्षक विसरुन गेलेले आहेत.
सुरक्षा रक्षक आंदोलकांची उपसाचिव खताळ यांच्या सोबत सकारात्मक चर्चा

गेल्या १७  मे पासून सुरक्षा रक्षकांचे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे चालू होते, आणि त्याच पार्श्वभूमीवर आज शुक्रवार रोजी मंत्रालय येथे कामगार विभागाचे उप सचिव दादासाहेब खताळ यांची भेट क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघर्ष कृती समिती संलग्न क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटनेचे प्रतिनिधी आंदोलकर्ते पत्रकार सतिष एस राठोड, सुशिल पवार, क्रांती ज्योत कामगार संघटनेचे अध्यक्ष दिपकभाऊ थोरात, सौ. स्वाती खिल्लारे यांनी भेट घेतली, भेटीदरम्यान सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीचा मुद्दा महत्वाचा असल्यामुळे त्यावर फेर विचार करण्यात येईल व इतर मागण्यांचा नक्कीच विचार केला जाईल व सोडविण्यात येईल, असे स्पष्टीकरण कामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब खताळ यांनी दिले.

राज्यात सध्या जिल्ह्यानुसार ठाणे व बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, रायगड, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, सांगली, रत्नागिरी, नागपूर, चंद्रपूर, अमरावती असे एकूण १५ सुरक्षा रक्षक मंडळे स्थापन करण्यात आलेली असून, या १५ सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रात ३० जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे मा. पंकजकुमार, भा. प्र. से (विकास आयुक्त, असंघटित कामगार) यांनी दि. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी शासनास सादर केलेल्या सुरक्षा रक्षक मंडळांच्या कार्यालयीन कामकाजाबाबत चौकशी अहवालात सुरक्षा रक्षक हे राज्यशासन व केंद्रशासन राबवत असलेल्या अनेक योजना सुविधांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे. मा. पंकजकुमार यांच्या अहवालाची अंमलबजावणी करुन त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक मंडळाचे एकत्रीकरण करून एकच सक्षम मंडळ स्थापन करुन अहवालाची अंमलबजावणी करण्यात येईल.
सुरक्षा रक्षक आंदोलकांची उपसाचिव खताळ यांच्या सोबत सकारात्मक चर्चा

प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना काम मिळावे यासाठी नवीन आस्थापना नोंदणी करण्यात येईल, सध्या सुरक्षा रक्षक मंडळाकडे मनुष्य बळ कमी असल्यामुळे अडचणी येत असल्याचे व मनुष्य बळ वाढविण्यात येईल असे सांगितले, तसेच पीएफ, गणवेश बदल, थकीत वेतन, मंडळात चाललेल्या भोंगळ कारभाराची चौकशी, सुरक्षा रक्षक मंडळाच्या भरतीत हस्तक्षेप करून फसवणूक करत असलेल्या संघटनेवर कारवाई करण्याबद्दल, सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत आस्थापनेवर अतिक्रमण करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करण्याबद्दल, २०२१ या वर्षी अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळा मार्फत घेण्यात आलेल्या भरती प्रक्रीयेचा निकाल जाहीर करण्याबद्दल सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी संभाजीनगर (औरंगाबाद) टीम, ठाणे मुंबई टीम, नाशिक टीम, जळगाव टीम, तसेच क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघर्ष कृती समिती संलग्न सर्व संघटना व पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments