Business

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी 'मंगलचरणम् फाऊंडेशन'चा २७ जुलै रविवार रोजी भव्य गुणगौरव सोहळा

 

पाचोरा : मंगलचरणम् फाऊंडेशन (रजि. महा/२२०१७/जळगाव) तर्फे भव्य गुणगौरव सोहळा २७ जुलै रविवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ७५% पेक्षा अधिक गुण मिळवणारे तसेच NEET परीक्षेत ५०० हून अधिक गुण मिळवणारे आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि शाल देऊन गौरविण्यात येणार आहे.

       कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर आप्पा पाटील आमदार पाचोरा-भडगाव व प्रमुख मार्गदर्शक डॉ. हर्षल माने (संचालक - कृष्णा हॉस्पिटल पारोळा), डॉ. जगदिश साकवान (मंत्रालय – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी) तसेच गौरवशाली उपस्थिती लखीचंद पाटील युवा सेना जिल्हाध्यक्ष जळगाव, छत्रपती संभाजी नगर येथील युवा उद्योजिका तथा अभियंता अमृता चव्हाण, जारगावचे उपसरपंच दानिश बागवान, गोर सेना जिल्हाध्यक्ष, जळगाव अर्जुन जाधव, रमेश राठोड, पर्यावरण जतन समिती, रविंद्र बोडखे, M.Tech, Ph.D. (E&TC), राहुल पवार पोलीस निरीक्षक पाचोरा तसेच विशेष उपस्थिती घनशाम चौधरी, जिल्हाध्यक्ष भाजपा जळगाव, सत्कारमूर्ती सुनिल पाटील, सरपंच, जारगाव, कल्पना राठोड, शिक्षिका, अबुलैस खान उद्योजक, उत्तम राठोड चेअरमन मागास विद्यार्थी शिक्षण, राजेश कंडारे, डॉ. सागर गरुड, संचालक, विघ्नहर्ता हॉस्पिटल पाचोरा, श्रावण चव्हाण, अध्यक्ष भारतीय बंजारा क्रांती दल, अजहर खान, शहर अध्यक्ष, रा. काँग्रेस पार्टी, पाचोरा, शेख इरफान शेख इकबाल मन्यार, जिल्हा सचिव, काँग्रेस पार्टी, जळगाव, मधुकर राठोड, प्रदेश अध्यक्ष, भारतीय बंजारा क्रांती दल, सीताराम पवार, मुख्याध्यापक, नवजीवन विद्यालय पाचोरा, कल्पना राठोड व इतर मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार आहे.

      तसेच कार्यक्रमाचे संयोजक डॉ. अरविंद पवार (अध्यक्ष - मंगलचरणम् फाऊंडेशन, जळगाव) यांनी सांगितले की, या प्रेरणादायी कार्यक्रमाने विद्यार्थी, पालक आणि समाजात एक सकारात्मक ऊर्जेचा संचार केला आहे. मंगलचरणम् फाऊंडेशन चे हे कार्य निश्चितच विद्यार्थ्यांना यशासाठी प्रेरणा देणारे ठरणार आहे.



Post a Comment

0 Comments