Business

येणाऱ्या गणेशोत्सवासाठी स्त्री आधार केंद्र सज्ज, महिला कार्यकर्त्यांना ओळखपत्र देऊन पोलीस सहायता कक्षात केली नेमणूक

 

येणाऱ्या गणेशोत्सवासाठी स्त्री आधार केंद्र सज्ज, महिला कार्यकर्त्यांना ओळखपत्र देऊन पोलीस सहायता कक्षात केली नेमणूक


पुणे : स्त्री आधार केंद्रातर्फे येणाऱ्या गणेश उत्सवाकरिता स्वयंसेवकांसाठी दि.२८ ऑगस्ट रोजी प्रात्यक्षित प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. त्या त्याअनुषंगाने दि. ३१ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव काळात महिला सुरक्षितता स्वयंसेवकांची प्रशिक्षण आधारित परीक्षा घेण्यात आली होती, त्यामध्ये गुणांनुक्रमांक प्राप्त महिलांना दि.५ सप्टेंबर रोजी ओळखपत्र देण्यात आली. पोलीसांनी २२ सहायता कक्ष तयार केले आहेत त्या कक्षात त्यांची पोलीस सहायता कक्षात स्त्री आधार केंद्राच्या स्वयंसेवक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

स्त्री आधार केंद्र येणाऱ्या गणेशोत्सवासाठी सज्ज, महिला कार्यकर्त्यांना ओळखपत्र देऊन पोलीस सहायता कक्षात केली नेमणूक

यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना, बॉम्बस्फोट प्रतिरोधक, चोरी तसेच महिला छेडछाड प्रकरणे आली असता काय उपाययोजना करायला हवे, त्यामध्ये पोलिसांव्यतिरिक्त प्रशिक्षित महिला चांगले काम करू शकतील अशा प्रकारे आपत्तीमध्ये मिळून काम करायचे आहे असे विचार पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी व्यक्त केले.

स्त्री आधार केंद्र येणाऱ्या गणेश उत्सवासाठी सज्ज, महिला कार्यकर्त्यांना ओळखपत्र देऊन पोलीस सहायता कक्षात केली नेमणूक

गर्दीच्या ठिकाणी महिलांनी आपली काळजी कशी घ्यावी यांची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निंबाळकर मॅडम यांनी उपस्थित महिलांना दिली. स्त्रियांचं पुनर्वसन करताना स्त्रीचं घर, शेती या गोष्टी देखील पुनर्वसनात येतात, सामाजिक काम करताना स्त्रीला योग्य दिशा मिळाली पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत केले.

स्त्री आधार केंद्र येणाऱ्या गणेश उत्सवासाठी सज्ज, महिला कार्यकर्त्यांना ओळखपत्र देऊन पोलीस सहायता कक्षात केली नेमणूक

मा.डॉ. नीलम गोऱ्हे उपसभापती विधानपरिषद व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडला. तसेच विश्वस्त जेहलम जोशी, पो. उपायुक्त संदीप गील पुणे, पो.निरीक्षक निंबाळकर मॅडम यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments