Business

बॅडमिंटन स्पर्धेत आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाची धडाकेबाज कामगिरी

 बॅडमिंटन स्पर्धेत आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाची धडाकेबाज कामगिरी

ठाणे : मुंबई विद्यापीठ क्रीडा विभागातर्फे ठाणे विभागीय आंतर महाविद्यालयीन मुले बॅडमिंटन स्पर्धा नुकतीच के एम अग्रवाल महाविद्यालय, कल्याण येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ठाणे विभागातील ३३ महाविद्यालयातील तब्बल २०१ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला.

बॅडमिंटन स्पर्धेत आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाची धडाकेबाज कामगिरी

आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयातील मुलांनी या स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकावून आपल्या कौशल्याची चमक दाखवली. या स्पर्धेत आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयातील मुलांच्या संघात अभ्युदय चौधरी, वेदांत जवंजल, साई मोरे, झाकुओं सेयी, नीरज जाधव, ऋषी रेडेकर आणि वेदांत सकपाळ यांचा सहभाग होता. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रा.सुशांत दिवेकर, प्रा.संजय चौधरी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांचे मार्गदर्शन लाभले.

बॅडमिंटन स्पर्धेत आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाची धडाकेबाज कामगिरी

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शारदा एज्युकेशन सोसायटी संस्थेचे आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखीते, संस्थेचे अध्यक्ष विलास ठूसे संस्थेचे सचिव प्रा.प्रदीप ढवळ आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments