कांदिवली (मुंबई) : कांदिवली येथील गणेश इंडस्ट्रीज येथे सर्व कामगार संघ (संलग्न- टी. यू. सी. आय) च्या वतीने आज १ मे रोजी ' कामगार दिवस ' साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कामगारांच्या बलिदानाच्या प्रतीक असलेले लाल रंगाचा झेंडा ध्वजारोहण कॉ. गजानन साळुंखे यांच्या हस्ते फडकाऊन साजरा करण्यात आला. तसेच कॉ. गजानन साळुंखे यांनी लाल रंगाच्या झेंड्याचा महत्व तसेच कामगारांच्या संघर्षाची, बलिदानाची व्यथा त्या लाल रंगाचे महत्व अगदी सोप्या पद्धतीने कामगारांना पटवून दिलेत.
सविस्तर बातमी व्हिडिओ पहा.
तसेच कॉ. रविंद्र जोशी यांनी सांगितले की संपूर्ण जगामध्ये 1 मे रोजी कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच आपल्या पूर्वजांनी सुमारे दिडशे वर्षांपूर्वी जात, पात, धर्म, विसरून अनेक लढाई ही कामगारांसाठी लढले आहेत. आणि कामगारांना न्याय मिळवून दिला आहे, व लाल रंगाचा झेंडा हा त्यांच्या बलिदानाचे प्रतीक आहे, असे सांगितले.
0 Comments