Business

१ मे म्हणजे हक्काची सुट्टी, १ मे रोजी कामगार दिन का साजरा केला जातो ?

१ मे म्हणजे हक्काची सुट्टी, १ मे रोजी कामगार दिन का साजरा केला जातो ?

✍🏻 सतिष एस राठोड, पत्रकार (कामगार प्रतिनिधी)

मुंबई : १ मे या दिवसाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी महराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मात्र एवढंच नाही १ तर मे ला आंतरराष्ट्रीय महत्त्व देखील आहे. कारण जगभरात हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. अठराव्या शतकात झालेल्या एका कामगार चळवळीच्या गौरवासाठी आजही जगभरात साजरा करण्यात येणारा हा एक खास दिवस आहे.

भारतात कामगार दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते. विशेष म्हणजे जगभरात अनेक देशांमध्ये हा दिवस निरनिराळ्या पद्धतीने साजरा केला जातो. यासाठीच जाणून घ्या १ मेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन का साजरा केला जातो.

१ मे म्हणजे हक्काची सुट्टी…। या दिवशी काय असते ? असा प्रश्न विचारला तर पटकन उत्तर द्यायला अनेक जण सरसावतील आणि या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, या दिवशी कामगार दिन साजरा केला जातो असे सांगतील. पण १ मे रोजी   कामगार दिन का साजरा केला जातो ? हे जाणून घेणे आवश्यक आहे .

आंतरराष्ट्रीय कामगार दिन दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. काही लोक तो, मे दिवस म्हणूनही साजरा करतात. हा दिवस मजुरांच्या कर्तृत्वाला आणि देशाच्या विकासात त्यांच्या योगदानाला सलाम करण्याचा दिवस आहे. असे अनेक देश आहेत जिथे या दिवशी सुट्टी दिली जाते.

दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिवस आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो. तसेच १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही महाराष्ट्रात साजरा केला जातो.

तसेच औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांची निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व १८९१ पासून १ मे हा कामगार दिन पाळण्यात येतो.

कामगार दिनाचा उगम 19 व्या शतकातील युनायटेड स्टेट्मध्ये कामगार संघटनेच्या चळवळीतून झाला आहे. 1889 मध्ये मार्क्सवादी इंटरनॅशनल सोशालिस्ट काँग्रेसने मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी एक ठराव मंजूर केला ज्यामध्ये कामगारांना दिवसातून 8 तासांपेक्षा जास्त काम करण्यास भाग पाडू नये अशी मागणी केली. यानंतर, हा वार्षिक कार्यक्रम बनला आणि 1 मे हा कामगार दिन म्हणून साजरा करण्यात आला.

14 जुलै 1889 रोजी युरोपमधील समाजवादी पक्षांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसने घोषित केल्यानंतर 1 मे 1890 रोजी मे दिन साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय कामगार दिन दिन 1 मे रोजी बहुतेक  80 हून अधिक देशांमध्ये मे दिवस साजरा केला जातो.  कामगार आणि कामगार चळवळीतील संघर्ष आणि बलिदानाची आठवण म्हणून कामगार दिन पाळला जातो.  

1886 युनायटेड स्टेट् ऑफ अमेरिका मध्ये हेमार्केट येथे 5 लाख कामगारांनी 16 तासांच्या कामाच्या दिवसा विरोधात सर्वसाधारण संपाची घोषणा केली होती. कामगारांना 16 तासांचे वेळापत्रक कमी करण्याऐवजी 8 तासांचा कामाचा दिवस हवा होता. या करीता निषेध मोर्चाचे आयोजन केले. पोलीसांनी हा मोर्चा मोडुन काढण्याच्या दृष्टीने मोर्चावर बॉम्ब टाकला. त्यामुळे यास हिंसक वळण लागले गेले. आणि यामध्ये 7 पोलिस अधिकारी यांच्यासह चार नागरिकांचा मृत्यू झाला, अनेक लोक जखमी झाले. जगभरातील कामगारांच्या हक्कांचे प्रतीक म्हणून या घटनेकडे पाहुन नंतर जगभरात संताप निर्माण झाला, कामगार चळवळीसाठी निरनिराळ्या देशातही कामगार शहीद झाले आणि 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून स्थापित करणेत आला.

जो ' मेहनतीने ' त्रासाला दूर करतो,

रक्त आणि घाम गाळण्यासाठी जो ' मजबूर ' असतो,

तो प्रत्येक जण ' मजदूर ' असतो...

Post a Comment

0 Comments