Business

कामगार मंत्र्यांनी सुरक्षा रक्षकांसह त्यांच्या परिवाराला आणले रस्त्यावर, संघर्ष पेटणार ?

कामगार मंत्र्यांनी सुरक्षा रक्षकांसह त्यांच्या परिवाराला आणले रोडवर, संघर्ष पेटणार ?

संघर्ष पेटण्याची शक्यता, कामगार मंत्री यांचा निषेध सुरक्षा रक्षकांकडून व्यक्त केला जात आहे.

मुंबई : शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले आणि सुरक्षा रक्षकांना एक आशेचे किरण दिसू लागले, शिंदे फडणवीस सरकारकडून सुरक्षा रक्षकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा तमाम महाराष्ट्रातील  सुरक्षा रक्षकांनी केली होती, परंतु शिंदे फडणवीस सरकारकडून सुरक्षा रक्षकांना न्याय दिला गेला नाही. मग मुद्दा सुरक्षा रक्षक मंडळ एकत्रीकरणाचा असो, प्रतीक्षा यादीतील सुरक्षा रक्षकांना काम उपलब्ध करून देण्याचा असो, किंवा वेतनवाढीचा असो, सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीचा मुद्द्यावर सध्या कामगारमंत्री सुरेश खाडे यांचा सुरक्षा रक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त केले जात आहे.

महागाईची झळ बसून सामान्य नागरिकांसह सुरक्षा रक्षक सुद्धा त्रस्त झालेले आहेत. अन्नपदार्थ, इंधन, गॅस सिलेंडर, घरभाडं यांच्यासोबतच जवळपास प्रत्येक गोष्टी महागल्या आहेत. सुरक्षा रक्षकांनी कोरोना सारख्या भयंकर महामारीत आपल्या जीवाचे रान केले आहे. सुरक्षा रक्षकांना दिले जाणारे वेतन हे तुटपुंज्या आहे, त्यात परिवाराची जबाबदारी, मुलांचे शिक्षण व इतर खर्च भागवणे सुरक्षा रक्षकांना शक्य नाही. महागाई गगनाला भिडली असून सुरक्षा रक्षकांचे जगणे मुश्किल झाले आहे. घर चालवणे कठीण झाले आहे.

गेल्या २०१७ मध्ये बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनात रु. ३,594.15 वाढ करण्यात आली होती. त्यांनतर गेल्या ५ वर्षे ही पगारवाढ प्रलंबित होती. त्या कालावधीत करार हा दोन वेळा संपतो. त्यामुळे सुरक्षा रक्षकां मुंबई : ची वेतनवाढ ही रु. ५,००० पेक्षा जास्त अपेक्षित होती. दिलेल्या वेतनवाढीमध्ये बदल करुन  ठाणे आणि बृहन्मुंबई सुरक्षा रक्षक मंडळ सह तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांची वेतनवाढ ही रु. ५,००० पेक्षा जास्त तात्काळ करायला हवी होती. परंतु तसे काही झाले नाही, त्याच गोष्टींचा असंतोष म्हणून सुरक्षा रक्षकांनी कामगार मंत्री यांच्या बाबतीत निषेध व्यक्त करत आहे. येणाऱ्या आठवड्या सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीचा मुद्दा पेटणार असल्याची चर्चा सुरक्षा रक्षकांमध्ये रंगलेली आहे.



Post a Comment

0 Comments