Business

करोडोच्या संपत्तीचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना तुटपुंज्या वेतनवाढ, आणि 25 लाखांच्या पुरस्कार कार्यक्रमात 13 कोटींहून अधिक खर्च ?

सुरक्षा रक्षकांना तुटपुंज्या वेतनवाढ करून सरकारकडून चेष्टा..!

25 लाखांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, कार्यक्रमात 13 कोटींहून अधिक खर्च आणि करोडोच्या संपत्तीचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना तुटपुंज्या वेतनवाढ.

ठाणे : महाराष्ट्र राज्य स्थापित सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. शासनाकडून तसे पत्र देखील जाहीर करण्यात आले आहे. त्यात सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीच्या बाबतीत सुरक्षा रक्षकांची चेष्टा शासनाकडून करण्यात आलेली आहे.



एकीकडे गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या पुरस्कारात 25 लाख रुपये पुरस्कार रक्कम ही पुरस्कार प्राप्त व्यक्तीला शासनाकडून दिली जाते, परंतु 25 लाख रुपये पुरस्कार रक्कम आणि त्यावर 13 कोटी रुपयांहून अधिक खर्च करणाऱ्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी याचाही विचार करावा की, याच महाराष्ट्राच्या धर्तीवर सुरक्षा रक्षक सुद्धा आहेत. यात हेच दिसून येते की, सुरक्षा रक्षक व त्यांच्या परिवाराच्या अस्तित्वाचे शिंदे फडणवीस सरकारला जाणीव नाही.

Sgb
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून नेहमी सांगितले जाते की, शिंदे फडणवीस सरकार हे जनसामान्यांचे सरकार आहे, पण याच सरकारकडून जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर अन्याय होतांना दिसत आहे. महागाई ही गगनाला भिडलेली असून सुद्धा सुरक्षा रक्षकांना दिले जाणारे वेतन हे तुटपुंज्या आहे. आणि गेल्या पाच वर्षांपासून सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीचा तिढा हा प्रलंबित होता, सुरक्षा रक्षकांना वाटत होते की, वेतनवाढीचा विषय हा नक्कीच अपेक्षेप्रमाणे सुटेल अशी अपेक्षा असतांना शासनाने वेतनवाढ केली ही खरी, पण त्यातही तुटपुंज्या वेतवाढ करुन सुरक्षा रक्षकांवर अन्याय केले आहे.


कामगार शेतकरी यांच्या बाबतीत गतिमान सरकार असल्याचा नेहमी सांगितले जाते, पण हे नेमका सरकारचे कांगावा म्हणावे लागेल.


Post a Comment

0 Comments