पुणे - पत्रकार उत्कर्ष समितीवर पत्रकार परमेश्वर वाव्हळ यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली आहे.समाजहित, सामाजिक प्रबोधन समाज सेवेचे व्रत घेवून लेकनीच्या माध्यमातून अन्यायला वाचा फोडत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला मजबूत करण्यासाठी व पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकार परमेश्वर वाव्हळ यांच्या योगदानाबद्दल पनवेल येथे पत्रकार उत्कर्ष समितीची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत पत्रकार परमेश्वर वाव्हळ यांची पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आल्याची उद्घोषणा पत्रकार उत्कर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी या बैठकीत केली.
दरम्यान पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्य पदांची जबाबदारी पत्रकार परमेश्वर वाव्हळ यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे यांनी प्रसिद्धीस केलेल्या पत्रकात दिली आहे.दरम्यान या निवडीमुळे पत्रकार परमेश्वर वाव्हळ यांचे बीडचे सामाजिक कार्यकर्ते कैलास वडमारे, सरपंच अमोलराजे तिपाले,माजी सरपंच राहल वडमारे, माजी सदस्य राजेंद्र वडमारे,ग्रा.प.सदस्य बबन वाव्हळ, माजी सदस्य राम ढोणे, सुधीर मुंजाळ, पत्रकार राजेंद्र राठोड, पत्रकार सतिष राठोड, पत्रकार गणेश कांबळे, शिव संग्राम पक्षाचे पुणे शहरध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, भारतीय मराठा महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सचिन राऊत, कामगार नेते तुकाराम कुंभार,आशेरमुख फाउंडेशनचे अध्यक्ष कांताभाऊ राठोड, युवा नेते शिद्धार्थ सिरसाठ, चंद्रकांत बोचकुरे, मनोज गजभार, किरण बिंराजे, राकेश भुजबळ,आकेश वाव्हळ, यांच्या सह संबंध राज्यभरातुन अभिनंदन केले जात आहे.
0 Comments