मुंबई : पुणे जिल्ह्यातील अग्निशमन दलाच्या कात्रज स्टेशनचे ड्यूटी ऑफिसर यांची चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.
याबाबतचा प्रश्न सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील अग्निशमन दलाच्या कात्रज स्टेशन ड्युटी ऑफिसर यांच्याबाबतच्या तक्रारींची शासनस्तरावर गंभीर दखल घेऊन संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा, यांच्यामार्फत चौकशी करण्यात येऊन दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सचिन अहीर यांनी सहभाग घेतला.
0 Comments