Business

नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी गजानन जाधव यांची निवड

 

नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी गजानन जाधव यांची निवड

नवी मुंबई : नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी विदर्भ यवतमाळ जिल्हा, दारव्हा तालुक्यातील चिखली गावचे सुपुत्र गजानन कृष्णा जाधव यांची निवड नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल कौशिक यांनी दि. 31 मार्च शुक्रवार रोजी निवड केली आहे. तसेच या आनंदाच्या क्षणी कृष्णा जाधव यांची विदर्भ व नवी मुंबईतील सर्वंच समाज बांधवांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.  महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री बंजारा नायक कै. वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक या दोन्ही महापुरुषांनी महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला दुरवर ओळख निर्माण करुन दिलेली आहे. तसेच बंजारा समाजाची नाळ पूर्वीपासूनच कॉंग्रेस पक्षासोबत जोडलेली आहे. त्याअनुषंगाने आज देखील बंजारा समाजातील तरुणांना नेतृत्व करण्याची संधी काँग्रेस पक्षाकडून दिली जात आहे.

नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी गजानन जाधव यांची निवड

तसेच नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पदी कृष्णा जाधव यांची निवड झाल्यामुळे त्यांनी अनिल कौशिक यांचे आभार मानून गोर गरिब सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव पुढाकार घेणार असल्याचे सांगितले व पक्षाने नवी मुंबईचे नेतृत्व करायला संधी दिली आहे. त्याबद्दल पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्य करेल. तसेच अनिल कौशिक साहेब यांच्या आदेशाचे पालन करुन कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी तसेच पक्ष वाढीसाठी सदैव प्रयत्नशील राहील. कै. माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक व सुधाकररावजी नाईक साहेबांनी वाढविलेल्या काँग्रेस पक्षासोबत काम करण्यास मला संधी मिळाली आहे या संधीचे मी सोनं करेल. तसेच नवी मुंबईतील तमाम जनतेला न्याय मिळवून देईल अशी ग्वाही दिली.

राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संजयभाऊ राठोड व  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस (प्रशासन व संघटन) देवानंदभाऊ पवार आणि प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे स्वीय सहायक मदनभाऊ जाधव यांनी कृष्णा जाधव यांची नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे.

नियुक्ती पत्र स्विकारतांना राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे प्रदेश संघटक शंकरभाऊ पवार, बंजारा मजदुर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकभाऊ जाधव व दिव्याचे समाजसेवक बाबू राठोड हे उपस्थित होते.