Business

मंत्रालय व प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर महात्मा फुले यांच्या जयंती दिनी आरक्षण हक्क कृती समितीचे आक्रोश धरणे आंदोलन

मुंबई : आरक्षण हक्क कृती समितीच्या राज्य निमंत्रक असलेल्या  महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीय संघटनांची दि . 28/3/2023 रोजी ऑनलाईन बैठक संपन्न झाली.
        महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती दिनी दि. 11/4/2023 रोजी महात्मा फुले यांना वंदन करून खाजगीकरणाचा व ज्यात आरक्षण नसलेला दि. 14/3/2023 चा काढलेला शासन निर्णय  तात्काळ रद्द करावा ,मा. सर्वोच्च न्यायालयाने दि 28/1/2022 रोजी आदेश दिले असून  त्या अनुषंगाने केंद्र सरकारने (डीओपीटी) दि 12/4/2022 रोजी निर्देश देऊन सुद्धा सरकारने पदोन्नतीतील आरक्षण न देणे,जुनी पेन्शन योजना सर्व निम सरकारी महामंडळे /प्राधिकरण यांसह  सर्वाना सुरू करणे ,सरकारने नेमलेल्या समितीने तीन महिन्यातच अहवाल द्यावा इत्यादी विविध प्रश्नासाठी सर्व मागासवर्गीय - बहुजन संघटनांचा मंत्रालयावर( मुंबई ,नवीमुंबई ,ठाणे ,पालघर जिल्ह्यांचा ) आणि इतर सर्व जिल्ह्यांचा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर  जन आक्रोश धरणे आंदोलन करण्याचा  निर्णय घेण्यात आला. या बैठकीस आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य निमंत्रक अनुक्रमे मा.सुनिल निरभवने ( राज्य परिवहन ), मा.एस के भंडारे (म्हाडा गृहनिर्माण ),मा .सिद्धार्थ कांबळे (सेंट्रल रेल्वे युनियन ) , मा. शरद कांबळे (बँक असोशिएशन ),मा. विजय चौरपगार ( शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना ), मा.शामराव जवंजाळ (मागासवर्गीय शिक्षक संघटना ),सुरेश पवार ( आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटना ) आणि  मा.गौतम कांबळे (शिक्षक संघटना ) इत्यादी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
       आपल्या SC, ST, DT, NT, SBC, OBC च्या न्याय हक्कासाठीच्या लढ्यात  मोठ्या संख्येने  सहभागी व्हावे असे आवाहन आरक्षण हक्क कृती समितीने केले आहे.

Post a Comment

0 Comments