Business

बंजारा समाजाचा अभिमान! अविनाश माणिक राठोड यांची VJTI मुंबई येथून पीएच.डी. पदवी संपादन

बंजारा समाजाचा अभिमान! अविनाश माणिक राठोड यांची VJTI मुंबई येथून पीएच.डी. पदवी संपादन

“अविनाश माणिक राठोड यांनी VJTI मुंबईसारख्या प्रतिष्ठित संस्थेतून पीएच.डी. पदवी संपादन करून बंजारा समाजाचा गौरव वाढविला आहे. त्यांचे हे यश समाजातील नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून, शिक्षण, संशोधन आणि जिद्दीच्या बळावर यशाची नवी शिखरे गाठता येतात, याचे ते उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!”

शहापूर : अभियांत्रिकी आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत श्री. अविनाश माणिक राठोड यांनी मुंबई येथील प्रतिष्ठित वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) येथून पीएच.डी. (Ph.D.) पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशामुळे बंजारा समाजासह शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अविनाश राठोड यांनी ‘An Experimental and Numerical Heat Transfer Enhancement in Jet Impingement’ या विषयावर आपले संशोधन पूर्ण केले. हे संशोधन त्यांनी डॉ. नितीन गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण केले.

त्यांच्या संशोधनाचा संबंध औष्णिक अभियांत्रिकी (Thermal Engineering) क्षेत्रातील उष्णता हस्तांतरणाची कार्यक्षमता वाढविण्याशी आहे. आधुनिक औद्योगिक तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे शीतकरण, ऊर्जा कार्यक्षमता तसेच विविध औद्योगिक प्रक्रियांमध्ये या संशोधनाचे विशेष महत्त्व आहे. तांत्रिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या या विषयावर संशोधन करून त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या यशामागे त्यांची मेहनत, सातत्य, जिद्द, चिकाटी आणि संशोधनाप्रती असलेली निष्ठा महत्त्वपूर्ण ठरली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात मिळवलेले हे यश निश्चितच युवकांसाठी प्रेरणादायी आणि समाजासाठी अभिमानास्पद आहे.

बंजारा समाजाचा अभिमान! अविनाश माणिक राठोड यांची VJTI मुंबई येथून पीएच.डी. पदवी संपादन

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्राध्यापक श्री. अशोक बबन राठोड (नायक, शहापूर), प्राध्यापक श्री. रमेश लक्ष्मण राठोड (कारभारी, शहापूर), प्राध्यापक श्री. एकनाथ राठोड, पदवीधर शिक्षक श्री. राजेश राठोड, अधीक्षक श्री. उमेश जाधव, आरोग्य सेवक श्री. भीमराव जाधव, वरिष्ठ लिपिक श्री. विजय राठोड यांच्यासह तमाम बंजारा समाजाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

अविनाश माणिक राठोड यांनी भविष्यातही संशोधन, अभियांत्रिकी आणि शैक्षणिक क्षेत्रात अशीच उत्तुंग भरारी घ्यावी आणि आपल्या कार्यातून समाजाचे नाव उज्ज्वल करावे, अशा सदिच्छांसह त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments