Business

' महाराष्ट्राचा वाघ ' विजय चौधरी ठरला विश्वविजेता; जागतिक मैदानात आस्मान दाखवत मिळवलं सुवर्णपदक

 

`महाराष्ट्राचा वाघ` विजय चौधरी ठरला विश्वविजेता; जागतिक मैदानात आस्मान दाखवत मिळवलं सुवर्णपदक

" एका ग्रामीण भागातून येऊन ३६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळता येणार आहे, ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. या स्पर्धेत मी नक्कीच चांगली कामगिरी करेन , असा विश्वास विजय चौधरी यांनी आधीच व्यक्त केला होता. "


विनिपेग (कॅनडा) : कुस्ती खेळातील महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू तीन वेळा 'महाराष्ट्र केसरी' विजेते आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजय नथ्थू चौधरी यांनी 29 जुलै 2023 रोजी कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती (Wrestling) या खेळामध्ये भारताचे नाव उंचावले आहे.

`महाराष्ट्राचा वाघ` विजय चौधरी ठरला विश्वविजेता; जागतिक मैदानात आस्मान दाखवत मिळवलं सुवर्णपदक


कॅनडाच्या विनिपेग येथे झालेल्या जागतिक पोलिस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळात कॅनडाच्या गतविजेत्या जेसी साहोताचा पराभव करीत त्याने भारताचे नाव उंचावत जगज्जेतेपद काबीज केले.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेले सायगाव बगळी या गावचे असलेले चौधरी हे महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय तीन वेळा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन, ईतर अनेक मानाच्या कुस्त्यांचे विजेतेपद आणि तसेच राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी आपले नाव कोरले आहे. चौधरी यांना काही महिन्यांपासून त्यांचे प्रशिक्षक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी बायो बबलमध्ये ठेवले होते आणि पुण्यातील कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात अनेक महिने कॅनडाच्या टाइम झोननुसार प्रशिक्षण घेत होते.

Post a Comment

0 Comments