Business

भ्रष्टाचार थांबवा, मंडळ वाचवा, उद्या थेट सुरक्षा रक्षक मंडळ, सानपाडा कार्यालयावरच आमरण उपोषण

 

भ्रष्टाचार थांबवा, मंडळ वाचवा, उद्या थेट सुरक्षा रक्षक मंडळ, सानपाडा कार्यालयावरच आमरण उपोषण
वेतन वाढीचा फेर विचार करून २०% ते २५% वाढ करण्यात यावी. व मंडळाच्या अधिकारात असलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजना सुरक्षा रक्षकांना लागू करावी.

- सतिष एस राठोड, पत्रकार


मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापित सुरक्षा रक्षक मंडळ हे १९८१ या वर्षी स्थापन करण्यात आले आहे. सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन करण्याचे मुख्य उद्देश्य म्हणजे सुरक्षा रक्षकांना खाजगी एजन्सी कडून होणारा छळ, लूटमार थांबावा आणि सुरक्षा रक्षकांना न्याय मिळावा असे अनेक कारण होते, यासाठी हे सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. पण सध्या तरी कोणत्याही गोष्टी अंमलात आणले जात नसून सुरक्षा रक्षकांचे छळ हे शासनाकडून होताना दिसत आहे.

वाढती महागाईची झळ बसून सुरक्षा रक्षक त्रस्त झालेले आहेत. अन्नपदार्थ, इंधन, गॅस सिलेंडर, घरभाडं यांच्यासोबतच जवळपास प्रत्येक गोष्टी महागल्या आहेत. आणि सुरक्षा रक्षकांनी कोरोना सारख्या भयंकर महामारीत आपल्या जीवाचे रान केले आहे. सुरक्षा रक्षकांना दिले जाणारे वेतन हे तुटपुंज्या आहे, त्यात परिवाराची जबाबदारी, मुलांचे शिक्षण व इतर खर्च भागवणे सुरक्षा रक्षकांना शक्य नाही. महागाई गगनाला भिडली असून सुरक्षा रक्षकांचे जगणे मुश्किल झाले आहे. घर चालवणे कठीण झाले आहे. मंडळाने तुटपुंजी वेतनवाढ करून सुरक्षा रक्षकांची दिशाभूल केल्याचे दिसून येत आहे. मंडळात नोंदीत असलेल्या सुरक्षा रक्षकांना गेल्या बेचाळीस वर्षांपासून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजनेचा फायदा मिळत नसून त्याची अंमलबजावणी सुरक्षा रक्षक मंडळाकडून केली जात नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरक्षा रक्षक त्रस्त आहेत.

अश्या अनेक समस्या आणि दलालांचा सुरक्षा रक्षक मंडळात वाढता हस्तक्षेप बंद व्हावा, आणि सुरक्षा रक्षक मंडळ हे भ्रष्टाचारमुक्त व्हावे यासाठी या आमरण उपोषणाचे आयोजन केले आहे. सदर उपोषण हे क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटना संलग्न क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघर्ष कृती समितीच्या वतीने केले जात असून त्यात वयक्तिक कोणताही स्वार्थ नसल्याचे संघटनेचे सदस्य उपोषणकर्ते पत्रकार सतिष एस राठोड यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सुरक्षा रक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सुरक्षा रक्षक बांधवांनी उपस्थित राहून या लढ्याला बळकट करावे असे आवाहन संघटनेचे उपाध्यक्ष गजानन साळुंखे यांनी केले आहे.

उपोषणाचे ठिकाण
        👇
सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा,
सानपाडा कार्यालय.
दि. ०९/०६/२०२३, रोजी,
सकाळी १०:०० वाजेपासून ते मागण्या मान्य होईपर्यंत.

Post a Comment

0 Comments