पनवेल : रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात २०१९ या वर्षी भरती झालेल्या प्रतीक्षा यादीवरील सुरक्षा रक्षकांच्या न्याय हक्कासाठी येत्या बुधवार दि. १० ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, पनवेल यांच्या कार्यालयावर पत्रकार सतिष एस राठोड यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच मोर्चाचे नेतृत्व करणारे राठोड यांनी गेल्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात प्रतीक्षा यादी संपुष्टात यावी व भरती संदर्भात संबंधित मंडळाची चौकशी करण्यात यावी तसेच वेतनवाढ व इतर मागण्या राज्य सरकार कडून मान्य करून घेण्यासाठी क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघर्ष समितीच्या वतीने लोकशाही मार्गाने आझाद मैदान येथे दि. १९/०२/२०२२ ते दि. ०९/०३/२०२२ पर्यंत तब्बल १९ दिवस ' अन्नत्याग आमरण ' उपोषण देखील केले होते. 'अन्नत्याग उपोषण' दरम्यान त्यांनी खुप मरण यातना भोगले, उपोषण दरम्यान त्यांना जी. टी. रुग्णालय, मुंबई येथे ५ दिवस भरती करण्यात आले होते. तरीही सुरक्षा रक्षकांना न्याय मिळत नसल्या कारणाने रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील प्रतीक्षा यादीवरील सुरक्षा रक्षकांना तात्काळ काम मिळावे यासाठी या मोर्चाचे आयोजन केले आहे.
२०१९ मध्ये काढण्यात आलेल्या रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ तसेच इतर मंडळाच्या भरतीमध्ये मोठी अफरातफर व भ्रष्टाचार झाल्याचे पत्रकार राठोड यांनी म्हटले आहे.
0 Comments