Business

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ तर्फे कल्याण येथे दि.२ ते ५ मार्च पर्यंत ग्लोबल खान्देश महोत्सवाचे आयोजन


उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ तर्फे कल्याण येथे दि.२ ते ५ मार्च २०२४ रोजी ग्लोबल खान्देश महोत्सव चे आयोजन

मंडळातर्फे दिले जाणारे या वर्षीचे खान्देश भूषण, खान्देश उद्योग रत्न, खान्देशश्री पुरस्कार जाहीर


आरोग्यदूत-रामेश्वरभाऊ नाईक,विश्वासराव शेळके पाटील यांना खान्देश भूषण, संजय बोरगावकर यांना खान्देश उद्योग रत्न, तर प्रशासकीय सेवेतील,जे. डी.पाटील,उन्मेष वाघ व योगेश पाटील यांना खान्देशश्री तसेच कला क्षेत्रातील सचिन कुमावत, पुष्पा ठाकूर यांना खान्देशश्री पुरस्कार जाहीर.

प्रतिनिधी : अशोकराव चव्हाण

कल्याण : उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ,तर्फे ग्लोबल खान्देश महोत्सव दिनांक २ ते ५ मार्च २०२४ रोजी फडके मैदान लालचौकी येथे रंगणार आहे. संपूर्ण कल्याणकरांसाठी खान्देश वासियांसाठी हा महोत्सव म्हणजे परभणीच असते. खान्देशातील अतिशय प्रसिद्ध अशा सर्वच गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला आणि आस्वाद घ्यायला मिळतात. अनेक जण आतुरतेने या महोत्सवाची वाट बघताना दिसून येतात. दिवसेंदिवस महोत्सवाची वाढत जाणारी लोकप्रियता आणि कल्याणकरांचा लाभणारा उदंड प्रतिसाद या साऱ्या गोष्टींचा विचार करत या वर्षाचा ग्लोबल खान्देश महोत्सव हा फडके मैदान, लालचौकी, कल्याण येथे आयोजित करण्याचे ठरले आहे. 

हा उत्सव म्हणजे मातीशी नातं सांगणारा उत्सव. ना नफा ना तोटा या तत्त्वावर फक्त अनेक होतकरू शेतकरी आणि उद्योजक यांना हक्काचं एक व्यासपीठ, रोजगार उपलब्ध व्हावा. त्यांच्या खाद्यपदार्थांची विक्री या ठिकाणी त्यांना करता यावी. यासाठी या खान्देश महोत्सवाचे आयोजन हे करण्यात येत असते. आपल्या मातीचा उत्सव, चला साजरा करूया खान्देश महोत्सव. कृषी-खाद्य, कला-उद्योग-पर्यटन, गौरव, पर्यावरण हि ग्लोबल खान्देश महोत्सवची वैशिष्टे. दि २ मार्च ते दि. ५ मार्च २०२४ सायंकाळी ०५ ते रात्री १० वाजेपर्यंत येथे सर्व कार्यक्रमांची रेलचेल चालणार आहे.. कल्याण पश्चिमकरांसाठीच नव्हे तर मुंबई ते कर्जत, कसारा, मुंबई ते डहाणू या पट्ट्यातील खान्देशवासीयांसाठी मेजवानीचा हा महोत्सव अध्यक्ष विकास पाटील व इतर मंडळीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणार आहे. 

● कार्यक्रमाची रुपरेषा ●

ग्लोबल खान्देश महोत्सव

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, कल्याण आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव २ ते ५ मार्च २०२४ रोजी, आपल्या मातीचा उत्सव चला साजरा करूया खान्देश महोत्सव.

कृषी-खाद्य, कला-उद्योग-पर्यटन गौरव, पर्यावरण ही ग्लोबल खान्देश महोत्सवाची वैशिष्टे. दि २ मार्च ते ५ मार्च २०२४ सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत असणार आहे.

उत्सवाचे ठिकाण

फडके  मैदान, लालचौकी कल्याण पश्चिम येथे ४ दिवसाचा आहे. कल्याण पश्चिमकरांसाठीच नव्हे तर मुंबई ते कर्जत, कसारा, मुंबई ते डहाणू या पट्ट्यातील खान्देशवासीयांसाठी मेजवानीचा हा महोत्सव अध्यक्ष विकास पाटील व इतर मंडळीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणार आहे.

चार दिवसाचा रंगारंग कार्यक्रमाने ग्लोबल खान्देश महोत्सव

१) शनिवार दि. २ मार्च २०२४ रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी नृत्यमहोत्सव सायंकाळी ६ ते ८ (समुह नृत्य स्पर्धा), सायंकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत उद्घाटन सोहळा, सत्कारमूर्ती गौरव मान्यवर मनोगत सायंकाळी ९ ते १० वाजेपर्यंत.

२) रविवार दि. ३  मार्च २०२४ सदाबहार संगीत रजनी स्पेशल खान्देशी बॉलिवूडचे सेलेब्रिटी परफॉर्मन्स खान्देश कन्या पुष्पा ठाकूर व सचिन कुमावत या बहारदार जोडीचे सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ८ ते १० वाजेपर्यंत सत्कारमूर्ती गौरव व मान्यवर मनोगत.

३) सोमवार दि ४ मार्च २०२४ खान्देशी ऑर्केस्ट्रा सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत .सत्कारमूर्ती गौरव मान्यवर मनोगत सायंकाळी  ८ ते १० वाजेपर्यंत.

४) मंगळवार दि. ५ मार्च २०२४ सांस्कृतिक कार्यक्रम एंटरटेनमेंट तडका श्रद्धा महीरे (नृत्य दिग्दर्शिका), निमिष कुलकर्णी (महाराष्ट्र हास्य जत्रा फेम), दिलीप केदार,(मिमिक्री आर्टिस्ट) सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत. सत्कारमूर्ती गौरव सांगता समारोह सायंकाळी  ८ ते १० वाजेपर्यंत असा ४ दिवसाचा रंगारंग कार्यक्रमाने ग्लोबल खान्देश महोत्सव संपन्न होणार. दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतचा भरगच्च मनोरंजनाचा कार्यक्रम तुमच्यासाठी ग्लोबल खान्देश महोत्सव घेऊन येत आहे.

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ कल्याण यांची कार्यकारणी

स्वागताध्यक्ष - नरेंद्रजी सुर्यवंशी, निमंत्रक - विकास पाटील, समन्वयक - प्रशांत पाटील, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ कल्याण कार्यकारणी अध्यक्ष - विकास पाटील कार्याध्यक्ष बापूसाहेब हटकर उपाध्यक्ष एल . आर. पाटील, प्रदीप अहिरे, एन एम भामरे , दिगंबर बेंडाळे, एस एन पाटील, सचिव दीपक पाटील, सहसचिव किशोर पाटील सुभाष सरोदे, अमोल बोरसे, खजिनदार एजी पाटील, सहखजिनदार संजय बिलाले, अनिरुद्ध चव्हाण, सल्लागार भरत गाडे, बी.डी बोराळे ,डॉ आनंदराव सूर्यवंशी ,गणेश भामरे, सुनील चौधरी, सदस्य प्रवीण सनेर, जगदीश पाटील, मिलिंद बागुल, विनायक संन्यासी, देविदास पाटील,सतिष पाटील, भूषण चौधरी ,भरत पाटील दीपक महाजन, सुभाष वानखेडे, सांस्कृतिक मंच प्रमुख विनोद शेलकर, सुनीता बोरसे, प्रकाश माळी, ठाणसिंग पाटील, विनोद शिंदे, अरुण अहिरराव, विजय पाटील, चेतना भालेराव, रतीलाल कोळी कार्यालयीन मंत्री सुनील पाटील, विभाग प्रमुख कल्याण पश्चिम प्रभाकर बोरसे, कल्याण पूर्व, गुलाबराव पाटील, भिवंडी जि ओ माळी, डोंबिवली पश्चिम प्रा. मगन सूर्यवंशी, डोंबिवली पूर्व प्रदीप चौधरी, बदलापूर विश्वनाथ पाटील, ठाणे पश्चिम अर्जुन पाटील, ठाणे पूर्व अनिल चौधरी,  टिटवाळा आशिष भदाणे, नवी मुंबई जितेंद्र रौदळे, मीरा-भाईंदर किशोर पाटील, पालघर डॉ.अरुण पाटील, महिला आघाडी अध्यक्ष भारती वानखेडे, कार्याध्यक्ष आशा भामरे, उपाध्यक्ष सुनंदा वाघ, सचिव वर्षा पाटील, सहसचिव भावना महाजन, खजिनदार धनश्री बुवा, सल्लागार कमल पाटील , वैशाली पाटील, विद्या अहिरे, कामिनी पाटील संगीता हटकर, संपर्कप्रमुख उज्वला पाटील, प्रसिद्धीप्रमुख नलिनी पाटील, हर्षला शंकर, सदस्य अर्पणा बिलाले, नीता पाटील,  मोनिका पाटील, अर्चना सरोदे, मनीषा पाटील व दिपाली चव्हाण, सजावट समिती यशवंत महाजन मनोहर भामरे सुधाकर भामरे, कैलास सरोदे, प्रफुल बोरसे, निलेश महाजन व सुरेश सरोदे, समाज मंडळ प्रतिनिधी रवी पाटील, शंकरराव आव्हाड, सतीश चौधरी, कांतीलाल परदेसी,  अविनाश सोनवणे, पन्नालाल पाटील, रविंद्र बाविस्कर, हेमंत चौधरी, एम डी रामोळे, भैय्यासाहेब पाटील, भूषण लांडगे, सुभाष राजपूत, विशाल बावा, भीमराव नार्वेकर, हेमलता विसपुते, रमेश कुंभार, संजय राजपूत, युवराज लोहार देवराम कणखरे, विशाल भारती, शब्बीर शेख व मुकीमभाई शेख.

विविध उपक्रम

१) ग्लोबल खान्देश महोत्सव 

२) महिला आघाडी

३) उत्तर महाराष्ट्र जल परिषद

४) विश्व अहिराणी संमेलन 

५) जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परीषद

६) खान्देश चेंबर्स ऑफ कॉमर्स

विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण या ग्लोबल खान्देश महोत्सवात आपल्या सर्वांसाठी खान्देशातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण लोकगीते नृत्य अहिराणी गीते लोकपरंपरा व खाद्य संस्कृती तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. 

Post a Comment

0 Comments